शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (08:55 IST)

माझ्याकडे गमावण्यासारखं काही राहिलं नाही; आईच्या निधनानंतर राखी सावंतची भावुक व्हिडीओ

अभिनेत्री राखी सावंतची आई जया भेडा या गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि शनिवारी २८ जानेवारीला त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. पुढे त्यांना ब्रेन ट्यूमरचेही निदान झाले आणि प्रकृती अधिकच खालावली. राखीने आणि तिच्या जवळच्या मित्रांनी निधनाची माहिती दिली.
आईच्या निधनानंतर राखीचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये ती रुग्णालयात असल्याचे दिसून येते. यावेळी, "आज माझ्या माझ्या डोक्यावरून आईचा हात उचलला गेला, आता माझ्याकडे गमावण्यासाठी काही राहिले नाही." असे म्हणत तिने दुःख व्यक्त केले. तसेच, राखीने तिच्या आईसोबतचा हॉस्पिटलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
 
यामध्ये तिने लिहिले आहे की, "आई मी तुझ्यावर प्रेम करते, तुझ्याशिवाय आता काहीही शिल्लक नाही, आता माझी हाक कोण ऐकेल, कोण मला जवळ घेईल. आता मी काय करू, कुठे जाऊ? मला तुझी खूप आठवण येते."
 
Edited By- Ratnadeep Ranshoor