1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (10:27 IST)

Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सध्या सतत चर्चेत असते. राखी सावंतची आई जया भेडा यांचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीच्या आईवर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याने अभिनेत्रीच्या आईच्या निधनाला दुजोरा दिला होता. आईच्या शेवटच्या क्षणी राखी सावंत तिच्यासोबत उपस्थित होती. आईच्या निधनानंतर राखी सावंत आता पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आईचा मृतदेह पाहून राखीला रडू कोसळले. राखीचा व्हिडिओही समोर आला आहे.
राखीला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती मीडियासमोर ढसाढसा रडू लागली. रडत रडत राखी म्हणत होती की 'आई गेली , माझी आई'. तो क्षण इतका कठीण होता की राखीसोबत उपस्थित असलेले सर्वजण रडू लागले.
 
राखी सावंतसोबत तिची मैत्रिण संगीता करपुरे आणि तिचा भाऊ राकेश सावंत होते. राखीने तिचा भाऊ आणि आईच्या मृतदेहासह कुटुंबातील सदस्यांना रुग्णवाहिकेतून कूपर रुग्णालयात पाठवले आणि ती स्वतः कागदोपत्री काम करण्यासाठी मागे राहिली. जया सावंत यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती राखीची मैत्रिण संगीता करपुरे यांनी दिली आहे.
 
राखीच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून नाजूक होती. राखी जेव्हा 'बिग बॉस मराठी' शोमधून बाहेर आली तेव्हा तिला तिच्या आईच्या तब्येतीची माहिती मिळाली. तिने लगेच हॉस्पिटल गाठले. यानंतर राखीने तिच्या आईच्या आजाराविषयी सोशल मीडियावर सांगितले होते. अनेक शस्त्रक्रिया करूनही राखीच्या आईच्या ट्यूमरचे कॅन्सरमध्ये रूपांतर झाले.तब्बल दोन  वर्षांपासून  त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या आखेर आज त्यांची प्राण ज्योत मालवली. 
 
Edited By - Priya Dixit