सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (14:45 IST)

कारभारी लयभारी फेम अभिनेत्री रश्मी पाटीलचा साखरपुडा झाला

Karbhari Laybhariserial
Photo- Instagram
कारभारी लयभारी फेम अभिनेत्री रश्मी पाटील हीच साखरपुडा 21 तारखेला झाला. तिने कारभारी लयभारी मालिकेत शोना मॅडमची भूमिका साकारली होती. रश्मीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अक्षय आहे. रश्मीने इंटिरियर डेकोरेटरचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले असून ती अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग करते.

तिने इंद्रभुवन चित्रपट मध्ये काम केलं आहे. एक गाव बारा भानगडी या वेब सिरीज मध्ये देखील तिने काम केलं आहे. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे आणि अक्षयचे फोटो टाकते.
 
साखरपुड्याला देखील तिने वेगळ्या रोमँटिक अंदाजात दोघांचे फोटो टाकले आहे. तिने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करून साखरपुड्याची बातमी दिली आहे. 
 
कारभारी लयभारी या मालिकेत शोना मॅडम ची भूमिका साकारून ती महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घरात आणि मनात शिरली. इंद्रभुवन या चित्रपटात देखील रश्मीने काम केले आहे. तिला नृत्याची आणि अभिनयाची लहानपणापासून आवड होती. तिला घरातून प्रोत्साहन मिळालं आणि तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. तिला लावणीची देखील आवड असून तिच्या युट्युब चॅनल देखील आहे, त्यावर तिने सादर केलेले लावणीचे नृत्याविष्कार बघायला मिळतात.यामुळे तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.   
 
 
Edited by - Priya Dixit