बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (11:55 IST)

या अभिनेत्रीने पहिल्यांदाच चुलीवर भाकरी भाजली

Photo- Instagram
माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री शीतल क्षीरसागर म्हणजे सिम्मी काकूंची भूमिका साकारणारी शीतल हिने चक्क चुलीवर भाकरी भाजण्याचा आनंद घेतला आहे.अभिनेत्री शीतलने हा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. हा अनुभव तिने कोकणातील गावातील चुलीवर भाकऱ्या थापल्या 
आहे. एका व्हिडिओत तिने हे शेअर केले आहे. तिने व्हिडीओ शेअर करत त्यात लिहिले आहे. 'चुलीवरची तांदळाची भाकरी फायनली..पहिल्यांदा मी प्रयत्न केला आणि ते करून दाखवलं. तुम्ही जाणकारांच्या सानिध्यात आणि त्यांच्या कमेंट ऐकत असाल तर सगळं काही शक्य आहे. सोबत तिने कोकण म्हणून हॅशटॅग वापरले आहे तिने हा कोकणातील अनुभव शेअर केला आहे. 
शीतल ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या ती कोकणात सुट्टी घालवत आहे. तिने माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत सिम्मी काकूंची नकारात्मक भूमिका साकारली होती. आता शीतल रमा -राघव या मालिकेत लावण्या परांजपेची व्यक्तिरेखा साकारत आहे. 
Edited by - Priya Dixit