रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : शनिवार, 22 एप्रिल 2023 (11:30 IST)

अक्षय्य तृतीया व्रत पूजा विधी Akshayya Tritiya Puja Vidhi

अक्षय्य तृतीया हा सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे.
या दिवशी या प्रकारे पूजा करुन देवाला प्रसन्न करावे.
उपवास करणार्‍याने सकाळी स्नान करून शुद्ध होऊन पिवळे वस्त्र परिधान करावे.
त्यानंतर घरातील मंदिरात विष्णूजींना गंगाजलाने शुद्ध करून तुळशीची माळ, पिवळे फुले अर्पण करावे.
त्यानंतर त्यांच्यासमोर उदबत्ती लावून आणि पिवळ्या आसनावर बसून विष्णु सहस्रनाम किंवा विष्णु चालिसाचा पाठ करा.
सर्वात शेवटी तुळशीला पाणी अर्पण करावे आणि श्रद्धेने आरती करावी.
त्यानंतर देवाला प्रसाद दाखवून सर्वांमध्ये वाटप करावा.
या दिवशी गरिबांना अन्नदान करणे किंवा दान करणे हे फार फलदायी आहे.
जव, गहू किंवा सत्तू, काकडी, हरभरा डाळ इत्यादी नैवेद्य म्हणून अर्पण करा.
 
या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
तसेच फळे, फुले, भांडी, कपडे, गाई, जमीन, पाण्याने भरलेली भांडी, कुऱ्हाडी, पंखे, तांदूळ, मीठ, तूप, तोफ, साखर, हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे पुण्यकारक मानले जाते.
या दिवशी मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला याचे दान द्यावे.
 
या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथी दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्म यज्ञ, पिंड दान आणि अन्न दान करावे. या दिवशी पाण्याचे मडके दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू,सातू, तांदूळ, मातीचे मडके, फळ दान करणे शुभ ठरेल. 
 
दान व्यतिरिक्त या दिवशी स्वत:साठी खरेदी करुन त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ देतं. म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदादसंबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रीअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृह प्रवेश, तसेच मंगळ कार्य करणे शुभ समजात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे. दान-पुण्य करावे कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात. म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे.