बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : शनिवार, 22 एप्रिल 2023 (08:04 IST)

अक्षय तृतीया पौराणिक कथा Akshaya Tritiya 2023 Katha

akshaya tritiya
अवतार श्रीकृष्ण यांनी त्यांना एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिलं होतं. हे असं पात्र होतं जे कधीही रिकामं राहतं नव्हतं आणि यामुळे पांडवांना कधीची अन्नाची कमी भासली नाही. यात भरपूर अन्न प्राप्त होत होतं. 
 
श्रीकृष्णाशी निगडित एक अजून कथेनुसार श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या दारी त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसाठी पोहचले होते. त्यांनी भेटस्वरुप कृष्णाला केवळ मूठभर पोहे दिले होते. श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला संकोच वाटत होतं तरी कृष्णाने सुदामाचे मूठभर पोहे चव घेत खाल्ले. सुदामा श्रीकृष्णाचे अतिथि होते म्हणून श्रीकृष्णाने त्यांचं भव्य आदर-सत्कार केला. असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले परंतू कृष्णाकडे आर्थिक मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही आणि ते काही न सांगता तेथून आपल्या घराकडे निघून गेले. परंतू सुदामा घरी पोहचले तर हैराण झाले कारण त्यांच्या तुटलेल्या झोपड्यांऐवजी तेथे भव्य महाल होतं आणि पत्नी व मुलं नवीन वस्त्राभूषणाने सुसज्ज होते. सुदामाला कळून आलं की त्यांच्या बालमित्र श्रीकृष्णाच्या आर्शीवादामुळे असे घडले. याच कारणामुळे अक्षय तृतीयेला धन-संपत्ती लाभ याने जोडून बघितले जातं.