शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (11:04 IST)

UP: अयोध्येत भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि बसच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

accident
उत्तर प्रदेशातील अयोध्येत झालेल्या भीषण रस्ता अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. येथे यूपीमधील अयोध्येहून आंबेडकर नगरच्या दिशेने जाणारी बस एका ट्रकला धडकली.आणि पालटली. या अपघातात 40 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. लखनौ-गोरखपूर महामार्गावर हा अपघात झाला.घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाचे पथक मदत आणि बचाव कार्य करत आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक पलटी होऊन बसच्या वर पडला रस्ते अपघातात बळी पडलेल्या सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघातानंतर डझनहून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे. जखमींना जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात येत आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 
Edited by - Priya Dixit