गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (09:20 IST)

Bangladesh: बांगलादेशात मोठा अपघात, भरधाव वेगात बस दरीत कोसळली, 17 ठार, 30 जखमी

बांगलादेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवान बस दरीत कोसळल्याने 17 जण ठार तर 30 जखमी झाले. बांगलादेशातील मदारीपूरमध्ये ही घटना घडली. ही बस इमाद ट्रान्सपोर्टची असल्याचे पोलिसांनी सांगितले. ढाकाकडे जाणारी बस सकाळी साडेसातच्या सुमारास मदारीपूरमधील एक्स्प्रेस वेवर नियंत्रणाबाहेर गेली आणि दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, 'बसच्या निष्काळजीपणाने आणि यांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे दिसते. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. 
 
वेगात असलेल्या बसचे चाक फुटले आणि बसचे नियंत्रण सुटले आणि ती दरीत कोसळली, असे समजते. अग्निशमन दलाच्या तीन तुकड्या मदतकार्य करत आहेत. भरधाव वेगात असलेल्या बसचे चाक फुटून बसचे नियंत्रण सुटून ती दरीत कोसळल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या तीन तुकड्या मदतकार्य करत आहेत. भरधाव वेगात असलेल्या बसचे चाक फुटून बसचे नियंत्रण सुटून ती दरीत कोसळल्याचे समजते.
 
Edited By - Priya Dixit