1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (17:13 IST)

नवलंच! नवरा-नवरीची चक्क गाढवावरुन एन्ट्री

सध्या लग्नात काही हटके करण्याचं फेड सुरु आहे. काही जोडपे लग्नात विमानातून एंट्री करतात. तर काही बाईक वरून तर काही हवेतून एंट्री करतात. तर काही ओपन कार मधून एंट्री करतात. लोक या साठी लाखो रुपये मोजतात. सध्या सोशल मीडियावर नवरा नवरीने चक्क गाढवावरून मिरवणूक काढल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
या व्हायरल व्हिडीओ मध्ये वर वधू चक्क गाढवगाडी मधून वरात काढली असून आजू  बाजूला बरेच लोक आहेत. गाढवा वरून एंट्री करताना ते दोघे आनंदी दिसत आहे. 
हा व्हिडीओ पाकिस्तानातील असून @pakistan _glitz या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आल्या आहे. या व्हिडिओला पाहून युजर्स खूप कॉमेंट्स करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit