मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 19 मार्च 2023 (16:31 IST)

Earthquake: इक्वाडोरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके, आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू, रिश्टर स्केलवर 6.7 तीव्रता

earthquake
इक्वेडोरमध्ये शनिवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने इक्वेडोरच्या किनारी ग्वायास प्रदेशात 6.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्था ने वृत्त दिले आहे की, देशाचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या ग्वायाकिलच्या आसपासचा परिसर भूकंपाने हादरला. भूकंपामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच घरे आणि इमारतींचेही नुकसान झाले आहे.
 
दक्षिणेस सुमारे 50 मैल (80 किलोमीटर) केंद्रीत होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये ग्वायाकिलच्या रस्त्यावर लोक जमताना दिसत आहेत. उत्तर पेरूमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. येथेही भूकंपामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. 
 
इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष गुलेर्मो लासो यांनी सांगितले की, या शक्तिशाली भूकंपात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे दक्षिण इक्वेडोर आणि उत्तर पेरूमधील इमारतींचेही नुकसान झाले.
 
Edited By - Priya Dixit