शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2023 (11:21 IST)

पुणे :क्रिकेट खेळताना मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुण्यात हडपसर भागात एका 14 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना हृदय विकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत धामणगावकर असे या मयत मुलाचे नाव आहे. 

सध्या राज्यात मुलांच्या परीक्षा संपल्या असून मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे मुले मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असताना वेदांताच्या छातीत दुखू लागले त्याने त्याच्या वडिलांना कळवले त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला दुसरी कडे नेण्यास सांगितले. त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे.    
 
Edited by - Priya Dixit