1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (07:29 IST)

प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश का केला? याचं कारण सांगितलं

priya berde
भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी पहिल्यांदाच भाजपात प्रवेश का केला? याचं कारण सांगितलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.
 
काय म्हटलं आहे प्रिया बेर्डेंनी?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना खूपच मर्यादा होत्या. अनेक मर्यादा माझ्यावर तेव्हा होत्या. भाजपात मला काम करण्याचा स्पेस मिळाला. मी त्याच कारणाने भाजपात आले. आत्तापर्यंत सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्लक्षित होता. या विभागाला फक्त प्रचारापुरतंच गृहित धरलं जायचं. मात्र आता असं होणार नाही प्रत्येक कलाकाराला न्याय मिळेल असं प्रिया बेर्डे म्हणाल्या आणि आपली भाजपात प्रवेश करण्यामागची भूमिका सांगितली.
 
प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधलं होतं. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. आता त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचं कारणही सांगितलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor