बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (21:15 IST)

होय, भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, वसंत मोरे यांची कबुली

vasant more
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेवर पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे नाराज होते. राज ठाकरेंचा आदेशांविरोधात भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहेत. यानंतर त्यांनी ठाण्यात मनसेच्या उत्तरसभेत भाजपसहित सगळ्या राजकीय पक्षांची ऑफर आली होती अशी माहिती दिली आहे. चर्चेतील चेहरा पुरस्कारावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती अशी कबुली वसंत मोरे यांनी दिली आहे.
 
पुणे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंनी महाराष्ट्रात ब्लू प्रिंट आणली, ती प्रिंट आपण कुठपर्यंत पोहोचवली, पुण्यात दोन नगरसेवक आम्ही आहोत जर ती ब्लू प्रिंट पाहायची असेल तर कात्रज आणि कोंडव्यात या काय विकास केलाय ते दाखवतो, १०० नगरसेवक असताना काम होत नाही परंतु दोन नगरसेवक असताना जे काम करुन दाखवले आहे. पुण्यात २ नगरसेवक आहे २९ नगरसेवकांची सत्ता होती पंरतु काही प्रभागनिहाय कारणांमुळे अडचणी आल्या आहेत.परंतु आजसुद्धा दोघांनी काम केले आणि पुरस्कार घेण्याची वेळी आहे. भाजपचे पुणे मनपामध्ये १०० नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४६ आणि शिवसेनेचे १० काँग्रेसचे नगरसेवक १० आणि मनसेचे २ नगरसेवक आहेत. तरिसुद्धा चर्चेतील चेहरा हा मनसेच्या नगरसेवकाला जातो म्हणजे आम्ही १०० टक्के काम केले आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने काम केले पाहिजे.