रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 फेब्रुवारी 2023 (15:15 IST)

अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा भाजपात प्रवेश

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
 
नाशिकमध्ये भाजप कार्यकारणीच्या कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांनी भाजप पक्षात प्रवेश  केला  आहे. सोबतच गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांच्यासह आणखी काही दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश केल्याचे समजते. 
 
2020 मध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित पुण्यात प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोनच वर्षता प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाता चर्चेला उधाण आले आहे.