शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (14:06 IST)

'चिकू की मम्मी दूर की' या शोसाठी परिधी शर्माने शिकले शास्त्रीय नृत्य!

मालिकांचे अनेक प्रोमो आपण पाहिले आहेत, पण अलीकडच्या 'चिकू की मम्मी दूर की'च्या प्रोमोमध्ये लिजेंड मिथुन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीमुळे चार चांद लागले असून प्रेक्षक आता चीकू आणि त्याची आई पुन्हा एकत्र कसे येतील याबद्दल अंदाज बांधत आहेत. या मालिकेत परिधी शर्मा आईची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि नेहमीप्रमाणे, ती तिचे ऑन-स्क्रीन पात्र नुपूर साकारण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
 
परिधीचे या मालिकेसोबत वेगळे नाते आहे कारण ती एक रिअल लाईफ आई देखील आहे. चाहत्यांना तिचे हे रूप नक्कीच आवडेल कारण तिने या भूमिकेच्या तयारीसाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. तिच्या व्यक्तिरेखेच्या तयारीबद्दल विस्ताराने, सांगताना परिधीने स्पष्ट केले की, “या भूमिकेसाठी शास्त्रीय नृत्य शिकणे माझ्यासाठी एक कठीण पाऊल होते! विशेषतः मुद्रा. कारण त्यात तुम्ही चूक करूच शकत नाही. आणि यासाठी माझ्या बालपणातील मेंटरचे मी आभार मानते. जी माझी तारणहार बनली आणि मला योग्य मुद्रांसह उत्कृष्ट शास्त्रीय नृत्य करण्याचा आत्मविश्वास दिला. तिच्या माझ्यावरील विश्वासाने मला माझ्या मुलीबरोबर शास्त्रीय नृत्याचा सराव करण्यास प्रोत्साहित केले. मी खरोखरच धन्य झाले आहे आणि आमच्या 'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेबाबतच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आतुर आहे."
 
परिधी शर्मासोबत वैष्णवी प्रजापती तिच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्लस नेहमीच आपल्या दर्शकांसाठी अद्वितीय आणि अनोख्या संकल्पना घेऊन येत असते आणि यावेळी 'चीकू की मम्मी दूर की' सह, चाहत्यांसाठी कधीही न पाहिलेली संकल्पना पडद्यावर आणण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या नव्या दृष्टिकोनामुळे, हा शो प्रत्येकाशी भावनिक संबंध स्थापित करण्यास सक्षम आहे. तेव्हा ही मालिका प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आपले विशेष स्थान कसे निर्माण करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!