सलमान खानला धमकावणारी व्यक्ती बिश्नोई गँगची नाही तर मानसिक रूग्ण निघाली
Bollywood News : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा 14 एप्रिल रोजी धमकी मिळाली. पोलिसांनी तत्परता दर्शविली आणि 24 तासांच्या आत आरोपीला पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानच्या नावाचा संदेश मिळाला, ज्यात सलमान खानच्या कारवर बॉम्बस्फोट होईल आणि सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली गेली. हा संदेश सलमान खानच्या नावाखाली प्राप्त होताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. हा खुलासा गुजरातमधील वडोदरा येथील असल्याचे उघडकीस आले आहे. एक तरुणाने हा संदेश पाठविला होता. पोलिसांनी प्रथम त्याला नोटीस पाठविली आणि नंतर ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी सलमान खानला धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
तसेच ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की तरुण हा मानसिक रुग्ण आहे. इतकेच नव्हे तर बिश्नोई टोळीशी त्याचा संबंध नाही हे तपासातही माहित उघड झाले.
जेव्हा सलमान खानला धमकी देणारा संदेश मिळाला, तेव्हा असा अंदाज वर्तविला जात होता की बिश्नोई टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे आणि त्याच टोळीच्या सदस्याने हा संदेश पाठविला आहे. सध्या वरळी पोलिस आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करीत आहे. परंतु आरोपी व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर ही कहाणी नवीन वळण घेत असल्याचे दिसून येत आहे.
सलमान खान धमकी देण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही त्याला बर्याच वेळा ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानला ठार मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली.
Edited By- Dhanashri Naik