1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (15:02 IST)

Poonam Pandey:पूनम पांडेचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल

poonam pandey
अभिनेत्री पूनम पांडेचा वयाच्या 32 व्या वर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. पूनमच्या मृत्यूला तिच्या मॅनेजरने दुजोरा दिला आहे. 
 
पूनम पांडेच्या निधनाच्या वृत्ताने चाहते आणि मनोरंजन विश्व शोकसागरात बुडाले आहे. दरम्यान, पूनमचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती बिग बॉस विजेता मुनावर फारुकीला सपोर्ट करताना दिसत आहे. पूनम म्हणतेय, 'मी पहिल्या दिवसापासून मुनव्वरला सपोर्ट करत होते. मला माहित होते की तो जिंकेल. 'लॉकअप' या शोमध्ये मी तीन महिने त्याच्यासोबत होतो. त्याच्या विजयाचा मला खूप आनंद झाला आहे. माझ्या भावाचे अभिनंदन. हा व्हिडिओ 'टेली मसाला' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पूनम पांडेच्या निधनावर राखी सावंतने श्रद्धांजली वाहिली आहे.राखी म्हणते ती या जगात नाही के ऐकल्यावर माझे हात-पाय थरथरत आहे. ती माझी चांगली मैत्रीण होती.तिने नेह्मीच मला साथ दिली.  
 
पूनम पांडेचा जन्म 11 मार्च 1991 रोजी कानपूरमध्ये झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2011 मध्ये त्यांना कॅलेंडर गर्ल्स म्हणून ओळख मिळाली. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये ती फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवरही दिसली होती. 2013 मध्ये पूनम पांडेने 'नशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 
 
पूनम पांडेच्या इंस्टाग्राम हँडलवर सकाळी 11:15 ते 11:30 च्या दरम्यान एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे लिहिले होते.
 
 Edited by - Priya Dixit