गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:25 IST)

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपदी प्रसून जोशी

prasun joshi

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आले आहे.  त्याच्या जागी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री विद्या बालनलाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्याशिवाय त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीकाही झाली होती. निहलानी यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांची आडमुठी भूमिकाही कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सिनेक्षेत्रातूनही त्यांच्यावर वारंवार टीका सुरु होती.