शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (22:48 IST)

86 वर्षीय प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना कोविडची लागण झाली, रुग्णालयात दाखल

देशात पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोविडची प्रकरणे दररोज झपाट्याने समोर येत आहेत आणि आता बॉलिवूडमध्येही त्याचा कहर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सना कोविडचा फटका बसला आहे. सोमवारीच एकता कपूर, जॉन अब्राहम, प्रिया रुंचाल, डेलनाज इराणी यांनाही कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्याने त्यांना सोमवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले . अभिनेत्यावर उपचार करणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, 86 वर्षीय प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते म्हणाले की, दोघांचीही प्रकृती बरी असून एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.