शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (13:10 IST)

अहमदनगर मधील 86 आंतरराष्ट्रीय प्रवासी हाय रिस्कमध्ये

सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ने सर्वांची झोप उडवली आहे.सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा उगम असणाऱ्या देशातून आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात येत आहे. असे भारतात परदेशातून आलेले अहमदनगरतील 86 प्रवासी हायरिस्क मध्ये आहे. सध्या ओमिक्रॉन चा जास्त प्रभाव असलेल्या देशातून एकूण 156 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 130 प्रवाशांचा शोध लावला आहे. उर्वरित 26 जणांचा शोध लावला जात आहे. ओमिक्रॉन प्रभावित देशातून आलेल्या प्रवाशांची संख्या 86 असून त्यांना हायरिस्क मध्ये प्रशासनाने ठेवले आहे .तर अन्य देशातून आलेल्या 70 प्रवाशांना लो रिस्क मध्ये ठेवले आहे.