गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (12:33 IST)

मराठा आरक्षण आंदलोनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळणार

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असं राजेश टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली होती. सतत पाठपुरावा केल्यानं मराठा समाजातील 34 युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याचं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं.