शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (12:30 IST)

लावालावी करणं हेच संजय राऊत यांचं काम - नारायण राणे

संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे लावालावीचं काम करतात, असाही आरोप राणेंनी केला.
"दिल्लीत पवार साहेबांच्याच कार्यालयात ते असतात. पक्षाशी त्यांची निष्ठा नाही. ते पक्षाशी प्रामाणिक नाहीत. ते आव आणायचं काम करत आहेत. ते दाखवतात तसे ते नाहीत," असं नारायण राणे हे संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले.
यावेळी नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली.
राणे म्हणाले, "राज्यातील आताचं हे सरकार चालत नाहीय. एसटी कामगारांचा प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही. राज्याचा विकास रखडला आहे."