शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (11:30 IST)

गव्याच्या हल्ल्यात तरुण ठार

काळ कोणत्या स्वरूपात येईल हे कोणीच सांगू शकत नाही. असेच काही घडले आहे. कोल्हापुरातील एका तरुणाबाबत .गवाच्या रूपात काळाने येऊन या तरुणावर झडप घातली.  कोल्हापुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्देवी घटना आहे कोल्हापुरातील पंचघाट परिसरातली .या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून एका गव्याने उच्छाद मांडला असून गव्याने एका तरुणावर हल्ला करून ठार मारले. तर दोघांना जखमी केले.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 
हा गवा भुयेवाडीच्या दिशेने जात असता.  या गवाच्या मागे काही नागरिक पडून त्याला सतावत होते. त्यामुळे हा गवा आक्रामक झाला. आणि भुयेवाडीच्या उसाच्या शेतात शिरळा. येथे तीन तरुणांनी त्याला हुसकावून लावले असता गव्याने तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यात सौरभ संभाजी खोत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रह्लाद पाटील आणि शुभम पाटील हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या गव्याला वन विभाग कोल्हापूर आणि अग्निशमन दल आणि पोलीस यांच्या माध्यमाने नैसर्गिक अधिवासात हुसकावून लावण्याच्या प्रयत्न सुरु आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.