शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (21:07 IST)

सरकारमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही -अमित ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात सक्रिय झाले आहेत. अशातच आता त्यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका अमित ठाकरे यांनी केली. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने मनसेकडून राज्यातील एकूण ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून मोहिमेत सहभागी होण्याची देखील विनंती केली होती. यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना अमित ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.