सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 डिसेंबर 2021 (12:22 IST)

ट्वीट आणि कँडल मार्चनं भाजपचा पराभव अशक्य - प्रशांत किशोर

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केलीय. ट्वीट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून तुम्ही भाजपला हरवू शकत नाही, असं प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटलं.
"देशात काँग्रेसशिवायदेखील विरोधीपक्ष शक्य आहे. तसेच, पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा द्यावी लागेल," असं प्रशांत किशोर म्हणाले.
"1984 नंतर काँग्रेसला एकातरी लोकसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळाला? गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा 90 टक्के निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी," असंही प्रशांत किशोर म्हणाले.