रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (17:35 IST)

यंदाही प्रियांकाची ऑस्करवारी

बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील ८९ व्या अॅकॅडमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी सज्ज झाली आहे. क्वांटिको’ अभिनेत्री प्रियांकाने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर करून ती ऑस्कर सोहळ्याला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे. प्रियांका चक्क मिक जॅगरसोबत कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी निघालीये. तिने टेक ऑफ वेळचा मिकसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, ती या दिग्गज अभिनेत्यासोबत का होती, यामागचे कारण तिने सांगितलेले नाही. प्रियांका चोप्रा दुस-यांदा हॉलीवूडमधील या सर्वात मोठ्या सोहळ्याला हजेरी लावत आहे. गेल्या वर्षीही, या ‘बेवॉच’मधील अभिनेत्रीने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तसेच, तिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.