मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (15:13 IST)

Rolls-Royce कारची मालकीण Priyanka Chopra पतीसोबत ऑटोरिक्षाने डेटवर गेली

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती पती निक जोनाससोबत भारतात आली आहे. प्रियांका चोप्रा तिचा हॉलिवूड चित्रपट 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी आली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या मालमत्ता आणि आलिशान कारसाठी देखील चर्चेत आहे. प्रियांका चोप्राकडे रोल्स रॉयच्या सर्व आलिशान गाड्या आहेत. पण मुंबईत आल्यानंतर प्रियांका चोप्राने पतीसोबत ऑटोरिक्षाने प्रवास केला.
 
प्रियांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पती निक जोनाससोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसत आहे. तर निक जोनास निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंसोबत प्रियांका चोप्राने कॅप्शन लिहिलं आहे की ती निक जोनाससोबत डेटवर गेली होती. तिने लिहिले, 'डेट नाईट अँड वन (रिक्षा इमोजी)... माझा कायमचा जोडीदार निक जोनाससोबत.'
 
अलीकडेच प्रियांकाने बॉलीवुडमध्ये स्वत:सोबत झालेल्या भेदभावबद्दल खुलासा केला होता, तेव्हा अनेक लोकांनी तिचे सर्मथन केले होते. दरम्यान ती नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल इव्हेंटचा भाग देखील होती.