शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:33 IST)

पुष्पाच्या यशानंतर चाहत्याने साकारला साउथ स्टार अल्लू अर्जुनचा पुतळा!

‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन भलताच चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. अनेक चाहत्यांनी अल्लूसारखी हेअर-स्टाईल केली तर कित्येकांनी इन्स्टावर ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉग म्हणत व्हिडीओज् शेअर केले. आता, औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा पुतळा साकारला आहे. अल्लू अर्जुनचे चाहत्यांमध्ये सिनेप्रेमी, क्रिकेटर यांच्यासह नेतेमंडळींचा देखील समावेश आहे. सिनेमातील डायलॉग आणि गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
 
औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा पुतळा साकारला आहे. पुतळ्यात अल्लू अर्जुनने हातात बंदूक घेतलेली दिसत आहे. हा पुतळा सोहन अल्लू अर्जुनला त्याच्या वाढदिवसाला भेट म्हणून देणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासह फहाद फासिलचीदेखील सिनेमात प्रमुख भूमिका आहे. ‘पुष्पा’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.