बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वास्तविक आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी, राधिका आपटेने केली अशी तयारी !

आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर परंपरागत व्यक्तिरेखांना सहजतेने साकारून दर्शकांच्या मनात उतरणे, ही राधिका आपटेची ओळख आहे. एखादी व्यक्तिरेखा जिवंत करताना राधिकाला ऑन-स्क्रीन बघणे प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरते कारण ती आपल्या व्यक्तिरेखेसोबत नेहमीच काहीतरी नवे घेऊन येते. अभिनेत्रीची प्रत्येक व्यक्तिरेखा आपापल्यापरीने अद्वितीय आणि आव्हानात्मक असते आणि तिच्या अशाच एका आगामी परियोजनेत आंतरराष्ट्रीय प्रॉजेक्ट 'ए कॉल टू स्पाय'चा समावेश आहे.
 
राधिकाचा आगामी प्रॉजेक्ट 'ए कॉल टू स्पाय'ची कहाणी वास्तविक जीवनावर आधारित आहे, ब्रिटिश स्पाय नूर इनायत खानच्या या आपल्या व्यक्तीरेखेसोबत जुळण्यासाठी, राधिकाने खूप मेहनत घेतली आहे. परफेक्ट लुक मिळवण्यासाठी आणि आपली व्यक्तिरेखा अधिक सटीक पद्धतीने साकारता यावी यासाठी तिने आपले केस देखील कापून टाकले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या व्यक्तिरेखा वास्तविक पद्धतीने सकारत व्यक्तिरेखेत प्राण फुंकते आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा बनवण्यामध्ये यशस्वी ठरते.  
 
राधिकाची व्यक्तिरेखा ‘युद्धात लढणाऱ्या शांतिवादी मुलीची आहे, जी रशियामध्ये एका अमेरिकी आईच्या पोटी जन्मलेली एक ब्रिटिश मुलगी आहे आणि तिचे वडिल फ्रांसमध्ये वाढलेले भारतीय मुस्लिम असून सूफीवादाशी संबंधित होते. तुम्हाला या व्यक्तिरेखेविषयी माहिती नसेल तर नूर, प्रधानमंत्री विंस्टन चर्चिल यांच्या गुप्त संघटनेचा एक भाग होत्या आणि मेडेलीनच्या नावाने ओळखल्या जात होत्या. नंतर त्या पकडल्या गेल्या आणि मरण्याआधी त्यांनी जो शेवटचा शब्द म्हटला, तो 'लिबर्टी' हा होता. दिग्दर्शक लिडियाने राधिकाला ही सर्व माहिती आणि तिची व्यक्तिरेखा यांमध्ये समन्वय शोधण्यात मदद केली आहे.
 
सामान्यपणे जेव्हा आपण युद्धाविषयी बोलतो, ऐकतो तेव्हा त्याचे नायक हे पुष्कळदा पुरुष असतात, मात्र खूप साऱ्या स्त्रिया अशा देखील आहेत, ज्या महायुद्धात सारख्याच बहादुरीने लढल्या आणि लिडिया त्यांच्या न सांगितलेल्या, न ऐकलेल्या कहाण्या सांगण्यामध्ये विश्वास ठेवते. राधिका देखील विश्व युद्धातील हे प्रकरण चित्रित करण्याबाबत स्वत:ला धन्य मानते. लिबर्टीच्या सेटवर असणे आणि तो पोशाख परिधान करणे, हा तिच्यासाठी एक संपन्न अनुभव होता.
 
आपला पुढचा प्रोजेक्ट 'रात अकेली'मध्ये, राधिका नवाज़ुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे आणि दर्शक या लोकप्रिय जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पहायला उत्सुक आहेत.