राधिका आपटेने सांगितला कोरोना काळात कोलकतामध्ये 'मिसेस अंडरकव्हर'च्या शूटिंगचा अनुभव

Last Modified शनिवार, 1 मे 2021 (18:06 IST)
इंडीस्टार राधिका आपटेने नुकतीच 'मिसेस. अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे 45 दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. कोरोना काळातील आरोग्याची गंभीर स्थिती पाहता, यामध्ये कुणाचेच दुमत नसेल की या चित्रीकरणाचा अनुभव कसा असेल.

राधिकाने स्वत:च याविषयीचा खुलासा केला, ती म्हणाली, "अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते."

शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.

ही ओटीटी क्वीन सध्या यशाच्या शिखरावर असून तिच्याकडे
अनेक मुख्य मासिकांची मुखपृष्ठे आहेत तसेच, 'ओके कॉम्प्यूटर' या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाबद्दल कौतुक झाल्यानंतर राधिका, भविष्यात लवकरच काही प्रमुख चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि काही अघोषित प्रकल्पांचा सहभाग आहे.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

तेथे मोजकेच बोलतात

तेथे मोजकेच बोलतात
एक माणूस वॅक्सीन घ्यायला जातो, खूप बडबड करत असतो... "डॉक्टर, दुखेल का?

प्रतिमा निर्मितीपेक्षा यात आणखी बरेच काही ...

प्रतिमा निर्मितीपेक्षा यात आणखी बरेच काही आहे....कोरोनाबद्दल अनुपम खेर यांनी केली मोदी सरकारवर टीका
भारतातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या प्रादुर्भावामुळे खळबळ उडाली आहे. ऑक्सिजनच्या ...

अनुष्काने मानले फ्रंर्टलाइन वर्कर्सचे आभार

अनुष्काने मानले फ्रंर्टलाइन वर्कर्सचे आभार
आरोग्सेवक आणि फ्रंटलाइन वर्कर्स या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माने ...

आता मात्र माझी टरकली

आता मात्र माझी टरकली
आता मात्र माझी टरकली

तडजोड करा

तडजोड करा
नवऱ्या बायकोत भांडणे झाली दोघात अबोला झाला,