मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (21:39 IST)

पूजा चव्हाण आत्महत्या जो बोया है…..वही पायेगा, तेरा किया आगे आयेगा - चित्रा वाघ

तब्बल १४ दिवसाननंतर वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांसमोर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘माझी आणि समाजाची बदनामी थांबवा, तपासात सत्य समोर येईलच’ असे म्हणत त्यांनी या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे स्पष्टीकरण तोकडे असून, तेच पूजा चव्हाणचे हत्यारे असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे या मागणीचा त्यांनी पुर्नउच्चार केला आहे. त्याबाबतचे एक ट्विटही त्यांनी शेअर केले असून, त्यामध्ये पूजा चव्हाण आणि मंत्री संजय राठोड यांचा एक फोटो शेअर केला आहे.
 
‘जो बोया है…..वही पायेगा, तेरा किया आगे आयेगा  महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’ अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटसोबत त्यांनी संजय राठाेड आणि पूजा चव्हाणचा एकत्रित असलेला एक फोटोही शेअर केला आहे.