मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (12:32 IST)

डियर जिंदगीसोबत रईसचे ट्रेलर

raees
बर्‍याच वेळेपासून शाहरुख खान अभिनित चित्रपट 'रईस' चर्चेचा विषय बनली आहे. कधी रिलीज डेटमुळे तर कधी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानमुळे. आता चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली आहे. 26 जानेवारीला ही रितिक रोशनचे चित्रपट 'काबिल'शी टक्कर घेणार आहे.  

काबिलचा ट्रेलर बर्‍याच दिवसांपासून रिलीज झाला आहे, पण 'रईस'च्या ट्रेलरची काहीच चर्चा नाही आहे. असे म्हटले आहे की शाहरुखच्या  वाढदिवसानिमित्त हे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात येईल, पण असे काही झाले नाही. आता वृत्त असे आहे की 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट 'डियर जिंदगी'सोबत याचे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात येईल. 
 
'डियर जिंदगी'मध्ये शाहरुखचा रोल भले लहान असेल पण कॅमियोपण नाही आहे. किंग खानची इच्छा आहे की या चित्रपटासोबत 'रईस'चे ट्रेलर दाखवण्यात यावे. तसे 'डियर जिंदगी'चे प्रदर्शित होण्याच्या दोन तीन दिवस अगोदर शाहरुख एक भव्य कार्यक्रम करून 'रईस'चे ट्रेलर जारी करू शकतो.  
 
राहुल ढोलकिया द्वारे निर्देशित चित्रपट 'रईस'मध्ये शाहरुख शिवाय माहिरा खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.