Raghav Parineeti Engagement परिणीती-राघवचा उद्या साखरपुडा
Instagram
परिणीती-राघव यांची एंगेजमेंट दिल्लीतील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. हा सोहळा पारंपारिक पद्धतीने होणार आहे. एंगेजमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांका 13 मे रोजी सकाळी दिल्लीला पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. प्रियांका फारच छोट्या दौऱ्यावर भारतात येत असली तरी. तिने आपले काम बाजूला ठेवले आहे आणि फक्त बहिणीसाठी भारतात येत आहे.
परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटमध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र सहभागी होणार आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा गेस्ट लिस्टमध्ये समावेश आहे. परिणीती फक्त डिझायनर मनीष मल्होत्राचा डिझायनर भारतीय पोशाख परिधान करेल. एंगेजमेंटसाठी परिणीतीने अतिशय साधे पण शोभिवंत पोशाख निवडल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, राघव चढ्ढा त्याचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेल्या मिनिमल अचकनमध्ये दिसणार आहे.
सध्या परिणीती तिच्या कुटुंबासह दिल्लीत आहे. ती एंगेजमेंटच्या तयारीत व्यस्त आहे. परिणीती आणि राघव हे गुपचूपपप्रकारे साखपुडा करत नसून एंगेजमेंटमध्ये संपूर्ण पंजाबी स्टाइल दिसणार आहे. एंगेजमेंटची थीम पेस्टल ठेवण्यात आली आहे.
