1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (11:23 IST)

राहुल -दिशा परमारने शेवटी दाखवली मुलगी नव्याची पहिली झलक

Rahul Disha Parmar
दिशा परमार आणि राहुल वैद्य सध्या त्यांची मुलगी नव्यासोबत त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगत आहेत. दिशाने 20 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या मुलीला जन्म दिला, मात्र तिने अद्याप नव्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नाही. दिशा आणि राहुल त्यांच्या राजकन्येसोबत प्रत्येक क्षणाचा मोकळेपणाने आनंद घेतात आणि त्यांच्या इन्स्टा हँडलवर त्याची झलकही शेअर करतात. पण यावेळी क्लिपमध्ये दिशाने नव्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवला आहे. मुलीच्या जन्माच्या चार महिन्यानंतर राहुल आणि दिशा ने त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे. विरल भयानी या इंस्टाग्रामच्या पेज वरून हा फोटो शेअर केला आहे. मुंबई विमानतळावरील दोहाला जाताना हा फोटो काढला आहे.

या व्हिडीओ मध्ये दोघे जण आपल्या मुलीची पापराजींना ओळख करून देत आहे. त्यांच्या मुलीचे नाव नव्या असे आहे.हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. या व्हिडियो वर चाहत्याने आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.  नव्या राहुल सारखी दिसते असे चाहते म्हणत आहे. 
 
Edited by - Priya Dixit