1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (09:09 IST)

आदित्य नारायणने चाहत्याला मारलं, फोनही फेकला, व्हिडीओ होतोय व्हायरल

Aditya Narayan
बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणही लोकप्रिय गायक आहे. आपल्या आवाजाच्या जोरावर आदित्यने गायनाच्या क्षेत्रात आपले वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर आदित्य मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आपल्या आवाजाबरोबरच आदित्य त्याच्या रागीट स्वभावामुळेही नेहमी चर्चेत असतो. दरम्यान, आदित्यचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
आदित्य नारायण कायम वादग्रस्त परिस्थितीमुळे चर्चेत असतो. आता देखील आदित्य याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आदित्य एका चाहत्याला मारताना दिसत आहे. शिवाय आदित्य याने चाहत्याचा मोबाईल खेचून घेतला आणि लांब फेकून दिला. आदित्य याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदित्य याच्या वाईट कृत्याची चर्चा रंगली आहे.
 
नेमकं काय घडलं?
आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्ट होस्ट करण्यासाठी गेला होता. यावेळी अनेक संगीतप्रेमी त्याठिकाणी उपस्थित होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आदित्य, अभिनेता शाहरुख खान याच्या ‘डॉन’ सिनेमातील गाणं गाताना दिसत आहे. याचदरम्यान, आदित्य संतापला आणि चाहत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आदित्य याचा कार्यक्रम सुरु असताना चाहता व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. ज्यामुळे आदित्य याला राग आला आणि गायकाना सर्वांसमोर चाहत्याला मारलं आणि फोन लांब फेकून दिला. दरम्यान आदित्य याच्या वागणुकीवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor