1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (12:47 IST)

राज कुंद्राला 27 जुलै पर्यंत कोठडी

Raj Kundra remanded till July 27 Bollywood News In Marathi Webdunia Marathi
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणात न्यायालयाने 27 जुलै पर्यंत कोठडी सुनावली आहे.राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रॉयन थोर्पे या दोघांना अश्लील चित्रपटाच्या निर्मिती बद्दल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती.
 
राजच्या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांनी राजच्या विरोधात साक्ष देऊन या प्रकरणात राजच मुख्य आरोपी असल्याचे सांगितले आहे. या पोनोग्राफी मधून मिळालेला पैसा राज ने ऑनलाईन सट्टेबाजीत लावण्याचे संशय व्यक्त केले जात आहे. राजचे परदेशात काही बँकेत खाते आहे.त्यामधून झालेल्या व्यवहारांची चौकशी पोलीस करत आहे. 
 
सध्या न्यायालयाने या दोघांची कोठडी वाढवली असल्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा भायखळा कारागृहात झाली आहे. 
 
प्रकरण असे आहे की अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट,वेबसीरीज,व्हिडियो बनवून त्याला मोबाईल अँप वर आणि काही संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या आरोपावर19 जुलैला अटक करण्यात आली होती.नंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.त्यांनतर राजच्या ऑफिसात तसेच बंगल्यावर चौकशी करण्यात आली असताना त्याच्या विरुद्ध सबळ पुरावे मिळाले.या आधारावर राज कुंद्राला अटक केली.