रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (19:44 IST)

रजनीकांत यांनी जेव्हा सेटवर विषारी नाग गळ्याभोवती गुंडाळला होता

rajinikanth
रजनीकांत आज 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत.वयाच्या 74 व्या वर्षीही त्यांनी तमिळ सिनेमामध्ये आघाडीचे अभिनेते म्हणून स्थान टिकवून ठेवलं आहे. त्यांच्या यशाच्या या फॉर्म्युल्याबद्दल फार काही सांगता येणार नाही. त्यांनी एक ब्रँड म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात मिळवलेलं यश हे अत्यंत मोठं आहे.
 
त्यांची स्टाईल, अभिनय, हेअर स्टाईल, बाऊन्सी डान्स, विनोदबुद्धी, सामान्य व्यक्तीसारखी नैसर्गिक बॉडी लँग्वेज या सर्वांच्या मिश्रणामुळं स्क्रीनवर जादू तयार होते.
 
तीच जादू त्यांनी आतापर्यंत अभिनय केलेल्या 169 चित्रपटांत दिसली आहे.
 
अगदी ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाच्या काळापासून ते डिजिटल सिनेमाच्या या पिढीपर्यंत प्रत्येक काळात त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग राहिला आहे.
 
स्क्रीनवर त्यांची जादू जेवढी चालते तेवढा चाहत्यांना स्वतःचा विसर पडतो. त्यातच आतापर्यंत रजनीकांत यांच्या चित्रपटांत दाखवण्यात आलेल्या सापांच्या दृश्यानं वेळोवेळी चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे.
 
'भैरवी' चित्रपटाच्या पोस्टरपासून सुरुवात होऊन, अगदी काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या '2.0' चित्रपटापर्यंत रजनीकांत आणि सापांशी संबंधित त्यांच्या भावनांची जादू चित्रपटगृहात चाललेली दिसते. साप म्हणजे भीती.
 
रजनीकांत यांची काही दृश्यांमध्ये दिसलेली भीती आणि त्यांच्या विनोदी अभिनयानं चाहत्यांना खूश केलं आहे.
 
'थंबीकू एंथा उरू' ते 'Robot 2'...
'थंबीकू एंथा उरू' चित्रपटामध्ये रजनीकांत त्यांच्या अंगावरून जाणाऱ्या सापाकडे लक्ष न देता वाचण्यात मग्न असतात.
 
पण एका क्षणाला अंगावर साप पाहून अचानक किंकाळतात आणि बोबडी वळावी, तसं त्यांना साप आहे हे बोलताच येत नाही. त्यामुळं चाहते खळखळून अगदी पोट दुखेपर्यंत हसत होते.
 
त्याचप्रमाणे 'अण्णामलाई' चित्रपटात रजनीकांत खूशबू यांच्या हॉस्टेलमध्ये दूध देण्यासाठी जातात. त्या ठिकाणी साप खुशबू यांच्या बाथरूमध्ये शिरतो.
 
खुशबू सापापासून वाचवण्यासाठी रजनीकांत यांना बोलावतात. यात रजनीकांत सापावर ओरडण्याचं दृश्य पाहून हसू आवरत नाही.
कथानायन याची साहित्य आणि सिनेमामध्ये एक विशिष्ट व्याख्या केलेली आहे. बदायाप्पा चित्रपटात नायकाच्या परिचयाच्या दृश्यामध्ये रजनीकांत त्यांचा हात सापाच्या वारुळात टाकतात. त्याला किस करतात आणि दूर करतात, त्यामुळं साप वारुळातच राहतो. ते दृश्य पाहूनही चाहते प्रचंड खूश झाले होते.
 
पण चंद्रमुखी आणि रोबोट 2 हे चित्रपट याला अपवाद आहेत. त्यात साप चित्रपटाचा मुख्य भाग दाखवले असून ते रजनीकांत यांच्याबरोबर दिसत नाहीत.
 
चंद्रमुखी चित्रपटात काही पात्र चंद्रमुखीच्या खोलीमध्ये 30 फुटी साप असल्याचं बोलताना दाखवलं आहे. यातील दृश्य कोणीही घाबरतील अशा प्रकारची नाहीत. पण संपूर्ण चित्रपटामध्ये साप दाखवण्यात आला आहे.
 
त्याचप्रमाणं 2.0 चित्रपटात खलनायक अनेक रुपांमध्ये येत असल्याचं दाखवलं असून त्यापैकी एक सापाचं रुप असतं.
 
नंतर रजनीकांत आणि चित्रपटातील सापांची दृश्य याचा यशाशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं दिग्दर्शकांनीही या भावना विचारात घेत दृश्यांमध्ये सापांचा वापर सुरू केला.
 
रजनीकांत यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये सापाची दृश्ये शूट करताना काही तंत्रज्ञांबरोबर आलेले काही किस्सेही सांगितले आहेत.
 
जेव्हा दात असलेला विषारी साप गळ्यात घातला
दिग्दर्शक सुरेश कृष्णा यांनी अण्णामलाई चित्रपट आणि त्यातील सापाची दृश्य याबाबत बोलताना सांगितलं की, "अण्णामलाई चित्रपटात खुशबू अंघोळ करत असते, तेव्हा साप बाथरूममध्ये शिरतो. तेव्हा दूधवाला असलेले रजनी खूशबू यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण तिथं येतात."
 
चित्रपटाच्या नरेटरनं रजनी याठिकाणी बोलत असल्याचं लिहिलं. पण ते अनैसर्गित वाटलं. त्यामुळं मी शुटिंगमद्ये रियालिस्टिक सीन दाखवला. मी ते पाहून घेईल, असं म्हणून ते निघून गेले.
 
नंतर मला जे वाटलं होतं तेच झालं. रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयानं संपूर्ण युनिटला मंत्रमुग्ध केलं. सापानं त्यांच्या अंगावर उडी मारताच मॉडेल हसू लागतात आणि घाबरतात.
 
हे काहीतरी वेगळं होतं. चांगलं होतं. एवढंच नाही, तर साप त्यांच्या अंगावर होता आणि त्याचं शूट करण्यात आलं. जसा शंकराच्या गळ्यात साप असतो, तसाच व्हिडिओ तयार केला. एक क्षण तर असा आला होता की, रजनीकांत यांनी घाबरून माझ्या नावाचा जप सुरू केला होता.
 
त्यानंतरचा टेक ओके झाला. पण नंतर सेटवर एकच गोंधळ उडाला होता. मी मागे पाहिलं तर मॅनेजर आणि गारुडी यांच्यात वाद सुरू होता.
 
सीन संपला आणि मी मॅनेजरकडं गेलो. म्हटलो त्याला पैसे दे आणि पाठवून दे, गोंधळ का सुरू आहे. त्यावर मॅनेजरनं सांगितलं की, "गारुड्यानं सापाचं तोंड शिवून आणायला हवं होतं.
 
पण तो विसरला आणि तोंड न शिवताच साप आणला. काय बोलायचं मला कळत नाही. सुदैवानं रजनीकांत यांच्या गळ्यात साप होता तेव्हा काही वाईट घडलं नाही," असं त्यांनी माय डेज विथ बाशा या पुस्तकात लिहिलं आहे.
 
चंद्रमुखी आणि सापाचे दृश्य
रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटात कथेमध्ये सापाचा सीन दाखवला जातो. पण चंद्रमुखी चित्रपटात एक 30 फुटी साप वेळी वेळी दिसतो आणि गायब होत असल्याचं दाखवलं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही व्हिज्युअल डिझाईनशिवाय तसं केलं आहे.
 
अगदी आजही नेटिझन्स इंटरनेटवर त्याची पॅरडी करतात.
 
चंद्रमुखी 2 च्या प्रदर्शनाच्या वेळी दिग्दर्शक पी. वासू यांनी याबाबत सांगितलं होतं.
 
"जिथं कुठं खजिना असतो तिथं एक साप असतो. त्यामुळं चंद्रमुखीच्या खोलीत एक साप होता. तुम्हाला पद्मनाभन मंदिर माहिती आहे. त्याठिकाणी चार-पाच खोल्या आहेत. खूप वर्षांनी जेव्हा त्याची दारं उघडली गेली, तेव्हा त्याठिकाणी अनेक साप होते."
 
मी चर्चेसाठी येणाऱ्या अनेक लेखकांना विचारलं की बंद खोलीत साप कसे गेले. मी वरिष्ठ लेखकांनाही विचारलं, कलाकारांना विचारलं. तेही म्हणाले की, जिथं खजिना असतो तिथं साप असतो. त्यामुळं सापाचा चित्रपटात समावेश करण्यात आला," असं दिग्दर्शक पी वासू म्हणाले.
 
त्यामुळं रजनी यांच्या आधीच्या चित्रपटात सापाचा सीन चांगला झाल्यानं तो पुढं एक पात्र ठरला. पण दृश्यात रजनीकांत किंवा ज्योतिका यापैकी कुणालाही त्याला छेडावसं वाटलं नाही.
 
चंद्रमुखीनंतर 2.0 मध्ये खलनायक असलेला पक्षीराजन अखेरच्या सीनमध्ये मोबाईल फोनद्वारे अनेक आकार तयार करतो.
 
त्यात तो सापाच्या रुपात येतो आणि रजनीबरोबर फाइट करतो. त्यानंतर आलेल्या रजनीकांत यांच्या चित्रपटात मात्र सापाची दृश्यं नव्हती.
 
Published By- Priya Dixit