सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (13:44 IST)

रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' ची 7 दिवसांतच 200 कोटींची कमाई

प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. एका रिपोर्टनुसार, अन्नत्थे या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर फक्त 7 दिवसांतच जवळपास 200 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे. रजनीकांत यांच्या जगभरातील चाहत्यांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे.
 
अन्नत्थे या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 70.19 कोटी तर दुसऱ्या दिवशी 42.63 कोटी रूपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 33.71 कोटी आणि चौथ्या दिवशी 28.20 कोटी रूपये, पाचव्या दिवशी- 11.85 कोटी, सहाव्या दिवशी 9.50 आणि सातव्या दिवशी- 6.39 कोटी रूपये या चित्रपटाने कमावले. 
 
आत्तापार्यंत एकूण 202.47 कोटी रूपये या चित्रपटाने कमवले आहेत. चित्रपट आणि ट्रेड अॅनॅलिस्ट मनोबाला विजयबालन या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल माहिती सोशल मीडिया दिली होती.
 
रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबतच प्रकाश राज, जगपति बाबू, वेला राममूर्ति आणि सूरी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात मीना, खुशबू सुंदर, नयनतारा आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 
 
सुपरस्टार रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.