रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (14:09 IST)

रजनीकांत, मोहनला, आमिर एकत्र काम करणार

"एस. एस राजमीली यांचा 'बाहुबली २' हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होतोय. असे असले तरी त्यांनी महाभारत या चित्रपटावर काम सुरू केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्‍य म्हणजे यात हिंदी, तमिळ आणि मल्याळम् चित्रपटाचे दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. आमिर खान, रजनीकांत आणि मोहनलाल या चित्रपटात काम करतील. 'महाभारत' हा चित्रपट देशातील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्गज कलाकारांना घ्यायचा विचार राजमौली यांचा आहे. हा आजवरचा भारतातील सर्वात बिग बजेट चित्रपट असेल. ४०0 कोटी रुपये या चित्रपटावर खर्च होणार असल्याचे सूत्राकडून समजते. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, साऊथ इंडियाचे दोन सुपरस्टार रजनीकांत आणि मोहनलाल यांना चित्रपटात घेण्याचे ठरत असल्याचेही सूत्राकडून  समजते. राजपौलीच्या 'महाभारत' चित्रपटात काम करण्याची सधी मिळाल्यास कर्ण किंवा अर्जुनची भूमिका करेन असे एका मुलाखतीत आमिर खान म्हणाला होता. 'महाभारत' चित्रपटाचे शूटिंग 2018 मध्ये सुरू होईल.