मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (10:46 IST)

Raju Srivastava Death : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला. हृदयामध्ये अनेक ब्लॉकेजेसचा अहवाल समोर आल्यानंतर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने राजूची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर, गतकाळापासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज प्राणत्याग केला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
 
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.