गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (12:58 IST)

इम्रान हाशमीवर दगडफेक, काश्मीरमधील शूटिंग संपवून फिरतना घडली घटना

इमरान हाश्मीबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये आहे, तिथे काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, पहलगामपासून काही अंतरावर शूटिंग संपवून इम्रान पहलगामच्या मुख्य बाजारपेठेत गेला, तेव्हा त्याच्यावर दगडफेक सुरू झाली. इम्रानसोबत उपस्थित असलेल्या इतर लोकांवरही दगडफेक करण्यात आली.
 
या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
 
इमरान हाश्मीवर चाहते नाराज होते
इमरान हाश्मी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये ग्राउंड झिरो या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. इम्रान जवळपास 14 दिवस श्रीनगरमध्ये होता. तो श्रीनगरच्या एसपी कॉलेजमध्ये शूटिंग करत होता. शूटिंग संपवून इम्रान निघाला तेव्हा त्याने वाट पाहणाऱ्या चाहत्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही, त्यामुळे लोक संतापले.
 
ग्राउंड झिरो या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देउस्कर करत आहेत. या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत सई ताम्हणकर आणि झोया हुसैन देखील दिसणार आहेत. इमरानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये आणखी अनेक चित्रपटांचा समावेश आहे. हा अभिनेता अक्षय कुमारसोबत सेल्फी या चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटात इमरान हाश्मीही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.