शनिवार, 2 डिसेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (16:56 IST)

Ram Charan: RRR फेम अभिनेता राम चरण बाबा होणार

राम चरण हा साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आहे. तो त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असतो. पण सध्या तो चर्चेत येण्याचे कारण खूप खास आहे. राम चरण यांची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला गरोदर आहे. राम चरण यांनी याबाबतची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे. 
 
रामचरणसाठी 2023 हे वर्ष खूप खास असणार आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हनुमानजींचा फोटो आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे- 'श्री हनुमानजींच्या कृपेने, आम्हाला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की राम चरण आणि उपासना त्यांच्या पहिल्या बाळाची वाट बघत आहेत.प्रेम आणि कृतज्ञतेने सुरेखा आणि चिरंजीवी कोनिडेला, शोभना आणि अनिल कामिनेनी.
जुलैमध्ये अभिनेता राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस इटलीमध्ये साजरा केला. राम चरण आणि उपासना कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले. एक वर्ष डेटिंग केल्यानंतर 14 जून 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. जुलैमध्ये उपासना प्रेग्नंट असल्याची खूप चर्चा झाली होती, पण उपासना म्हणाली की तिला सध्या मूल नको आहे आणि लोकांनी तिच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.
दक्षिणेकडील स्टार शेवटचा सुपरहिट चित्रपट 'RRR' मध्ये दिसला होता. 
 
Edited by - Priya Dixit