बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (12:41 IST)

राम गोपाल वर्मांनी दारू खरेदी करणाऱ्या महिलांचा फोटो पोस्ट करत केली खोचक टिका

आपल्या चित्रपटांसह नेहमी वादग्रस्त कमेट्स करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आले आहेत. आरजीव्हीने यंदा महिलांना टार्गेट केले आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी मद्यविक्रीच्या दुकानांपुढे महिलांनी रांग दर्शवत ट्विट केले आहे.
 
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात कंटेनमेंट झोन सोडून रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये सशर्त सुट देत अनेक ठिकाणी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी मद्यविक्री दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आणि अनेक फोटो व्हायरल देखील झाले. अनेक दुकानं उघडण्यापूर्वीच लोकं रांगेत उभे दिसले. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल एका फोटोमध्ये मद्यविक्रीच्या दुकानांसमोर महिलांनीही रांग लावल्याचं दिसून आलं. हाच फोटो राम गोपाल वर्माने शेअर केला आहे आपले खोचक विचार प्रकट केले. 
 
“पाहा, वाईन शॉपच्या रांगेत कोण दिसतंय…महिला सुरक्षेसाठी नशेडी पुरुषांविरुद्ध आवाज उचलणार्‍या, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे.