1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (12:38 IST)

दारुसाठी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

social distancing
Lockdown 3.0 मध्ये मद्य विक्री सुरु झाली आहे, आणि आजपासून दारुची दुकानं उघडण्यापूर्वीच देशभरात दुकानांसमोर लोकं रांगा लावून उभे राहिले. लोकं मद्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. 
 
देशाची राजधानी दिल्लीमध्ये तसेच छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये मद्य विक्री सुरु होताच दुकानांच्याबाहेर रांगा लागल्या आहेत. मद्यविक्री सुरु होताच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. 
 
राज्यात देखील पुणे आणि इतर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाल्याचे चित्र बघायले मिळत आहे.