गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2017 (10:44 IST)

राम गोपाल वर्माकडून जागतिक महिला दिनाच्या वादग्रस्त शुभेच्छा

बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाल वर्माने जागतिक महिला दिनाच्या वादग्रस्त शुभेच्छा दिल्या आहेत. मी जगातील तमाम महिलांना शुभेच्छा देतो की, त्यांनी पुरुषांना अभिनेत्री सनी लियोनसारखा आनंद द्यावा, असे वादग्रस्त ट्‌विट त्यांनी केले आहे.वर्माच्या ट्‌विटला अनेकांनी रिट्‌विट करत प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. राम गोपाल वर्माने यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांना आणखी एकट्‌विट करून सवाल केला होता की, ‘पुरुष दिन’ का साजरा होत नाही? बुधवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी ट्‌विटरवर लिहिले आहे, ” पुरुष दिन असत नाही कारण प्रत्येक दिवस हा पुरुष दिनच असतो आणि महिलांना फक्त एक दिवस महिला दिन असतो. पुरुष दिनाच्या दिवशी महिलांनी पुरुषांना थोडे स्वातंत्र्य दिले पाहिजे. या दिवशी पुरुष महिलांसाठी काय करतात हे माहिती नाही पण वर्षातला एक दिवस पुरुषांचा महिला दिवस असायला हवा,” असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. 
 
दुसरीकडे याच ट्विटर करून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि राम गोपाल वर्मा यांच्यामध्ये ट्विटरयुद्ध पेटलं होतं. अभिनेत्री सनी लिओनचा संदर्भ देत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या राम गोपाल वर्मांना आव्हाडांनी माफी मागण्याचा इशारा दिला आहे.