गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (14:28 IST)

रणवीर शौरीने सुशांतच्या मृत्यू बद्दल केला खुलासा म्हणाला-

ranveer shauray
महेश भट्ट यांच्यावर एका अभिनेत्याने असे काही आरोप केले आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेसे आहेत. हा अभिनेता दुसरा कोणी नसून पूजा भट्टचा एक्स बॉयफ्रेंड आहे. आम्ही रणवीर शौरीबद्दल बोलत आहोत हा अभिनेता अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्यांनी महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप करून त्यांचा पर्दाफाश केला आहे

नुकतेच रणवीरने पूजा भट्टसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही बोलले आणि महेश भट्टबद्दल एक मोठे वक्तव्यही केले . तसेच, अभिनेत्याने त्याचा सहकलाकार आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबद्दल आणि त्याच्यासोबत काय घडले असावे याबद्दल खुलेपणाने बोलले आहे 

रणवीर म्हणाला, मी आणि महेश भट्टची मुलगी पूजा रिलेशनशिप मध्ये होतो. मात्र, हे नाते तुटल्यावर दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. आता रणवीरने पूजासोबतच तिचे वडील महेश यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. रणवीर म्हणाला, 'जेव्हा मी त्याच्या मुलीसोबत होतो, तेव्हा मी महेश भट्ट यांचे आदर करत होतो. मात्र मला लगेच समजले की मला नीट वागणूक दिली जात न्हवती.मला दुटप्पी वागणूक दिली जात होती.  आणि इंडस्ट्रीत अनेक वाईट गोष्टी बोलल्या जात होत्या.

जेव्हा काही वर्षांनी सुशांतसोबत हे घडले तेव्हा मला वाटले की मी बोलावे.इथे लोक एखाद्या व्यक्तीच्या विरोधात टोळक्या करतात आणि इतरांचे करियर खराब करून स्वतःचे करियर बनवतात. हे सर्व इथे घडते.
रणवीरने सुशांत सिंग राजपूतसोबतच्या नात्याबद्दलही सांगितले. रणवीर म्हणाला, 'मी असे म्हणणार नाही की आम्ही खूप जवळ होतो, पण आम्ही चांगले मित्र होतो. आम्ही एकत्र काम केले. 'सोनचिरिया'च्या शूटिंगदरम्यान आम्ही दोन महिने एकत्र होतो आणि आम्ही खूप चांगले मित्र झालो. यादरम्यान रणवीरने इंडस्ट्रीतील राजकारणाबाबतही बोलले आणि इंडस्ट्रीमध्ये कोणाच्याही विरोधात गँग तयार करत असल्याचे सांगितले.
त्याला खाली उतरवण्यासाठी, एखाद्याचे करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी. हे सर्व घडते. 

सुशांतच्या निधनानंतर गटबाजीवर मोकळेपणाने चर्चा होऊ लागल्या. या चित्रपट इंड्रस्टीत असं सर्व काही होत. एखाद्याच्या विरोधात गॅंगबाजी करणं, त्याला बाजूला ढकलणं. त्याचे करिअर उध्वस्त करणं. हे सर्व इथे होत. सुशांतच्या बाबतीत पण असेच घडले असावे. 
 
 Edited by - Priya Dixit