मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (14:55 IST)

रवीना टंडनच्या वडिलांचे निधन, अभिनेत्री झाली भावूक, लिहली पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि दिग्दर्शक रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समोर आल्यानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांसोबतच सर्व सेलिब्रिटी रवी टंडन यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
 
रवीना टंडनने वडील रवीसोबतचे चार फोटो शेअर केले आहेत. त्यात त्यांच्या बालपणीचे चित्रही आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्ही नेहमी माझ्यासोबत चालाल. मी नेहमी तुमच्यासारखी राहीन. मी तुम्हाला कधीही जाऊ देणार नाही लव्ह यू पापा.
 
रवी टंडन यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1935 रोजी आग्रा, यूपी येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. ते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'खेल खेल में', 'अनहोनी', 'नजराना', 'मजबूर', 'खुद्दार' आणि 'जिंदगी' यांचा समावेश आहे.
 
रवी टंडन आणि त्यांची पत्नी वीणा यांना दोन मुले आहेत. एक मुलगा राजीव जो निर्माता आणि दिग्दर्शक आहे आणि 'हिना' टीव्ही मालिका बनवली आहे. एक मुलगी म्हणजे रवीना टंडन जिने बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली.