गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (10:44 IST)

अमोल पालेकर पुण्यातील रुग्णालयात दाखल

1970 आणि 80 च्या दशकात समांतर आणि अर्थपूर्ण सिनेमाचा नायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे अभिनेते अमोल पालेकर यांना प्रकृती खालावली असून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी सांगितले की "अमोल पालेकर यांच्या प्रकृतीबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. ते आता बरे होत आहेत. आणि त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे."
 
आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचे अमोल पालेकर यांच्या पत्नीने सांगितले. अमोल पालेकर यांना दीर्घ आजारावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
अमोल पालेकर यांनी बाजीरावच बेटा (1969) मराठी चित्रपट शांतता ! कोर्ट चालू आहे (1971) मधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. अमोल पालेकर यांनी 70 आणि 80 च्या दशकात गोलमाल, घरंडा, रंग-बिरंगी, श्रीमान श्रीमती, रजनीगंधा, चिचोर, नरम गरम, भूमिका, छोटी सी बात, सावन अशा अनेक चित्रपटांतून आपल्या व्यक्तिरेखेने ठसा उमटवला आहे.
 
त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1944 रोजी मुंबईत झाला. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अमोल पालेकर यांनी दोन लग्न केले होते. वयाच्या 57  व्या वर्षी त्यांनी पहिली पत्नी चित्रा पालेकर हिला घटस्फोट दिला आणि संध्या गोखले यांच्याशी लग्न केले.