शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (16:52 IST)

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने अभिनेत्री ऋचा चड्डाच्या बेबी बंब वर चुंबन घेतले. या मध्ये त्यांच्या चेहऱ्याला सर्वदूर प्रसिद्धी मिळत आहे. रेखा यांनी बेबी बंबचे चुंबन घेऊन आपले प्रेम व्यक्त करून आशीर्वाद दिलेत. 
 
प्रत्येक जण सोशल मीडियावर कौतुक करीत आहे. रेखा चित्रपट हिरामंडीच्या स्क्रिनिंगवर आली होती. या दरम्यान तिची भेट ऋचा चड्डा सोबत झाली. रेखाने प्रेगनेंट ऋचा चड्डाला पहिले तर ती स्वतःला थांबवू शकली नाही  आणि तिला भेटण्यासाठी तिच्या जवळ गेली. दोघीनी एकमेकांशी थोडावेळ गप्पा मारल्यात. या दरम्यान रेखाने ऋचा चड्डाच्या बेबी बंबचे चुंबन घेतले आणि येणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिले. रेखा सोबत यादरम्यान त्यांची सेक्रेटरी फरजाना देखील सोबत दिसली. रेखाच्या या व्हिडीओ वर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येतांना दिलेत आहे. काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. 

Edited By- Dhanashri Naik