शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2024 (12:15 IST)

अर्जित सिंहचा सर्वांसमोर सलमान खानने केला अपमान, 9 वर्षानंतर संपले शत्रुत्व

Salman Khan
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने प्रसिद्ध गायक अर्जित सिंह याचा सर्वांसमोर अपमान केला होता. यामुळे दोघांमध्ये गेल्या 9 वर्षांपासून संघर्ष सुरु होता. या दरम्यान सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटामध्ये अर्जित सिंहने गाणे गायिले नाही.   
 
अर्जित सिँहाला सलमान खानने लोकांसमोर अपमानित केले होते. सलमान खानने यानंतर आपल्या चित्रपटामध्ये अर्जित सिँहला गाणे गाऊ दिले नाही. दोघांमध्ये मनोमन खूप संघर्ष सुरु होता. सलमान खान आणि अर्जित सिंह यांच्यामध्ये गेल्या 9 वर्षांपासून वाद चालू होते. सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट आल्यानंतर अर्जित सिंह सोबत आलेले वाद संपुष्टात आलेत. आज अर्जित सिंग आपला 37 वा वाढदिवस साजरा करीत आहे. 
 
सलमान खान एक अवार्ड शो अतिथी होते आणि या शो मध्ये बेस्ट प्ले बॅक सिंगरचा अवार्ड अर्जित सिंह यांना दिला गेला होता. अर्जित सिंह साधे कपडे साधी चप्पल अश्या पेहरावात अवार्ड घेण्यासाठी स्टेजवर गेलेत. सलमान खानने या गायकाचा पेहराव पाहून त्याची खिल्ली उडवली होती. 
 
यामुळे सलमान खानच्या चित्रपटांमध्ये अर्जित सिंह ने गेल्या 9 वर्षांपासून गाणे गायिले नाही. या गायकाने अनेक वेळेस सलमान खानची माफी मागितली पण त्याने माफ केले नाही. आता या घटनेला 9 वर्ष झालेत. यादरम्यान आता दोघांमध्ये वाद संपुष्टात आले आहे. सलमान खानच्या 'टायगर 3' मध्ये अर्जित सिंहने गाणे गायिले आहे. आता दोघांमधील वाद संपुष्टात आले असल्याची माहिती समोर येत आहे.  

Edited By- Dhanashri Naik